औरंगाबाद: वेतन थकल्याने प्रभाग क्रमांक 3 मध्ये कचरा संकलनाचे काम देण्यात आलेल्या पी.गोपीनाथ रेड्डी कंपनीच्या कामगारांनी काम बंद केल्याचा प्रकार काल सोमवारी घडला होता. त्यापाठोपाठ आज मंगळवारी संबंधित कंपनीच्या कर्मचार्यांनी वेतन न मिळाल्याने प्रभाग क्र. 2,7 व 9 या तीन प्रभागात काम बंद आंदोलन केले. यामुळे सुमारे चार तास कचरा संकलनाचे काम ठप्प होते. मनपा प्रशासनाच्या वतीने कचरा संकलनाचे कंत्राट देण्यात आलेल्या पी. गोपीनाथ रेड्डी या कंपनीचे कचरा संकलन करण्यात येणारे अडथळे काही केल्या कमी व्हायला तयार नाहीत. एकीकडे केलेल्या कामाची देयके मनपा प्रशासनाकडूनमिळेनात अन् दुसरीकडे वेतन मिळत नाही म्हणून कामगार वारंवार काम बंद करत आहेत. काल सोमवारी प्रभाग क्र.3 मधील कचरा संकलनाचे काम करणार्या कामगारांनी सुमारे चार तास काम बंद आंदोलन केले होते.
अधिकार्यांच्या मध्यस्थीनंतर या कामगारांनी माघार घेऊन पुन्हा काम सुरू केले होते. या घटनेला चोवीस तास लोटत नाही तोच एप्रिल महिन्याचे वेतन अद्याप न मिळाल्याने प्रभाग क्र. 2, 7 व 9 येथील सुमारे 400 कर्मचार्यांनी आज काम बंद आंदोलन पुकारले. प्रभाग क्र. 2 मधील कर्मचार्यांनी सलीम अली सरोवर परिसरात, प्रभाग क्र. 7 मधील कर्मचार्यांनी खिंवसरा पार्क-उल्कानगरी, तर प्रभाग क्र.9 मधील कर्मचार्यांनी रमानगर स्मशानभूमी परिसरात एकत्र येऊन काम बंद आंदोलन केले. मे महिना संपत आला तरीही एप्रिल महिन्याचे वेतन अद्याप न मिळाल्याने हे पाऊल उचलले असल्याचे कर्मचार्यांचे म्हणणे आहे. अधिकार्यांच्या आश्वासनानंतर प्रभाग क्र.7 व 9 मधील कर्मचार्यांनी चार तासानंतर काम बंद आंदोलन मागे घेतले;परंतु प्रभाग क्रमांक 2 मधील कर्मचार्यांचे आंदोलन हे वृत्त देईपर्यंत सुरू होते.
अधिकारी-पदाधिकार्यांची मध्यस्थी रमानगर भागात महापौर नंदकुमार घोडेले यांनी आंदोलकांची भेट घेतली.
तुमची मागणी योग्य आहे;परंतु शहराला वेठीस धरू नका, अशी विनंती त्यांनी केली. यानंतर घनकचरा विभागप्रमुख नंदकिशोर भोंबे यांनी लेखाधिकारी महावीर पाटणी यांच्याशी बोलणे करीत संबंधित कंपनीला आज त्यांचे बिल अदा करण्यात येईल. त्यानंतर तुमचे वेतनही मिळेल, असे आश्वासन दिले. यानंतर कंपनीचे व्यवस्थापक मुरली रेड्डी यांनीदेखील उद्या दुपारपर्यंत वेतन देण्यात येईल, असे सांगितले. यावेळी बहुजन कामगार शक्ती महासंघाचे शहराध्यक्ष राजू मिसाळ यांनी कर्मचार्यांना काम सुरू करण्यास सांगितल्यानंतर प्रभाग क्र. 7 व 9 मधील कर्मचार्यांनी आंदोलन मागे घेतले. मात्र, यानंतरही प्रभाग क्र.2 मधील कर्मचार्यांचे आंदोलन हे वृत्त देईपर्यंत सुरू होते. आम्हाला पीएफ, इएसआय यापोटी आमच्या पगारातील किती रक्कम कपात केली जाते आदींची कुठलीच माहिती नाही. ही माहिती मिळेपर्यंत काम सुरू करायचे नाही, अशी काही कर्मचार्यांनी भूमिका घेतली असल्या